Posts

Showing posts from April, 2020

राज्य उत्पादन शुल्क विभागाची दौण्ड तालुक्यातील नांदूर, सहजपूर, खामगाव गाडीमोडी,या ठिकाणी सलग 4 दिवस सर्वात मोठी कारवाई....बापूसाहेब मेहेर ( समता परिषद पुणे )बिसनेस क्लब अध्यक्ष पुणे

Image
राज्य उत्पादन शुल्क चे पुणे ज़िल्हा अधीक्षक यांच्या शी फोन वरून संपर्क साधला व त्यांच्याशी चर्चा केली.देशा मध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला आहे.व देशा मध्ये संचार बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.तसेच पोलीस प्रशासनाने सर्वाना घरा मध्ये बसून सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.पोलीस योग्य ती  पाऊले उचलत आहे.परंतु तरीही काहीना कोरोना चे काही घेणे देणे नाही असे दिसत आहे.आपल्या दौण्ड  तालुक्यातुन हातभट्टी दारू सर्वात ज्यादा प्रमाणात उरुळी कांचन, वाघोली, लोणी काळभोर.तसेच पुणे विभागात जाते.आणि या सर्व ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोना वाढायला वेळ लागणार नाही.आणि दौण्ड मध्ये जर हा आजार आला तर तो थांबवने अवघड होईल.......बापूसाहेब मेहेर म्हणाले की आज पर्यंत च्या राज्य उत्पादन शुल्क पुणे अधीक्षका न पेक्षा हे अधिकारी वेगळे आहेत.त्यांनी स्वतः 15..20 जनाची टीम घेऊन स्वतः येऊन ही कारवाई केली..त्यामुळे दौण्ड विभागात सर्व सामान्य जनते कडून राज्य उत्पादन शुल्क पुणे अधीक्षक झगडे साहेब  व त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे... बाप्पुसाहेब मेहेर  समता परिषद पुणे  बिझने...

फेसबुक वरून महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या वर अक्षपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल... बापूसाहेब मेहेर (समता परिषद पुणे )

Image
दौंड : फेसबुक या सुप्रसिद्ध  सोशल साईटवरून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिनेश सुरेश गडधे (रा.बोरीपार्धी,दौंड ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे  नाव  असुन  या प्रकरणी मंगेश रायकर यांनी  फिर्याद दिली आहे. देशामध्ये कोरोनाच्या प्रभाव वाढला आहे. कोरोन्याच्या  विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये या साठी देशामध्ये लॉकडाउन   करून संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. पोलीस  प्रशासनाने सर्वांना घरांमध्ये बसून सहकार्य करावे असे आवाहन केले  आहे. या काळामध्ये टीव्ही बरोबरच लोक सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहे. पोलीस  प्रशासनाने सोशल  मीडियाचा वापर करण्याबाबत सावधगिरी बाळगण्याच्या सर्वांना सुचना  दिल्या आहेत. बोरीपार्धी येथे  राहणाऱ्या दिनेश गडधे यांनी शनिवार(ता.१८) रोजी फेसबुक या सोशल मीडियावरील दिनेश गडधे याच्या स्वतःच्या अकाउंट वरून महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री  छगन भुजबळ यांच्या बद्दल  आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती, म्हणून दिनेश स...

सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवा मात्र मोफत आलेला तांदूळ वाटा.... बापूसाहेब मेहेर (समता परिषद पुणे )

Image
राज्यात कोरोना लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रति महिन्याचे धान्य वाटून प्रति माणसी ५ किलो तांदूळाचे मोफत वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी करण्यात आले आहे. तसेच हे मोफत धान्य वाटप करण्यासाठी सकाळी ८ ते रात्रो ८ वाजेपर्यंत धान्य वाटण्याचे आदेश सर्व रेशनिंग अर्थात रास्तभाव धान्य दुकानदारांना बजाविण्यात आले आहेत. हे तांदूळ राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील कुटुंबीयांना, अंत्योदय अन्न योजनेतील सर्व लाभार्थी कुटुंबियांना वाटप करण्याचे आदेश त्यांनी बजावले आहेत. आतापर्यंत १२ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत ४६०३८७ रेशनकार्डधारकांना या धान्याचे वाटप करून मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. तर १६ एप्रिल २०२० रोजी सकाळी ८ पासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत १०७२११ अशा ५६७५९८ इतक्या रेशन कार्ड धारकांनी तांदळाची उचल केली आहे. सद्यपरिस्थितीत ६९८२८ क्विंटल तांदळाचा साठा असून आतापर्यंत ३४ टक्के रेशनकार्ड धारकांनी तांदळाची उचल केली आहे. मोफत तांदूळ हे जून २०२० पर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यासाठी दुकानदारांनी सकाळी ८ रात्रो ८ वाजपर्यंत दुकाने उघडी ...

मोफत धान्य रेशन दुकानात एप्रिल, मे आणि जुन मध्ये उपलब्ध राहणार....... बापूसाहेब मेहेर( समता परिषद पुणे )

Image
राज्यात  43 लाख 59 हजार 798 क्विंटल अन्नधान्याचे वाटप-छगन भुजबळ राज्यातील 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि.1 ते 15 एप्रिल २०२० या  पंधरा  दिवसात  राज्यातील 1 कोटी 35 लाख 54 हजार 441 शिधापत्रिका धारकांना तब्बल 43 लाख 59 हजार 798 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे.  या लाभार्थ्यांना ५२हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.       राज्यात या योजनेमधून सुमारे 18 लाख 51 हजार 043 क्विंटल गहू, 14 लाख 28 हजार 545 क्विंटल तांदूळ, तर  17 हजार 121 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात  अडकलेल्या सुमारे 6 लाख 68 हजार 622 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आ...

केंद्र शासनाकडून चणाडाळ किंवा तूरडाळ प्रत्येक नागरिकाला 1kg दिली जाणार..काही दिवसात शासनाकडून मिळणार........ बापूसाहेब मेहेर (समता परिषद पुणे)

Image
स्वस्त धान्यापासून वंचित असलेल्या राज्यातील 5 कोटी लोकांसाठी केंद्राने मदत करावी केंद्र सरकारकडून खरेदी केले जाणारे धान्य महाग असुन त्यात सवलत मिळावी : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान आणि छगन भुजबळ यांचा व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत येणारे अंत्योदय व बीपीएल योजनेच्या 7 कोटी लाभार्थ्यांना सहा महिने पुरेल एवढे अन्नधान्य राज्याकडे उपलब्ध आहे, परंतु राज्यातील सुमारे 5 कोटी लोक असे आहेत की जे सवलतीच्या स्वस्त धान्यापासुन वंचित आहेत. त्यांच्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. तसेच राज्य शासनाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 3 कोटी 50 लाख लोकांसाठी केंद्राकडून खरेदी केले जाणारे धान्य महाग असुन त्यात सवलत मिळावी अशी मागणी आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. यावेळी बालेतांना मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर राज्यात शिवभोजन थाळीच्या माध्यमातुन केवळ 5 रुपयात 1 लाख थ...

अंत्योदय / अन्न सुरक्षा योजनेत काळाबाजार कराल तर खबरदार, रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करणार :- समता सैनिक श्री बापुसाहेब मेहेर. रेशनींग विषयी तक्रार आणि माहीती साठी हेल्पलाईन.

Image
रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन कोरोना साथरोग नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत राज्यात रेशनिंगसाठी हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली आहे. जनतेने रेशनिंग संदर्भातील तक्रारी आणि माहिती मिळविण्यासाठी 1800224950 किंवा 1967 या नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे. लॉकडाऊन कालावधीत शिधावस्तू उपलब्धतेचे सनियंत्रण करताना रेशनिंग हेल्पलाईन बाबतीत जनतेत जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे दिसून आले आहे.  रेशनिंग साठीच्या तक्रारीसाठी/रेशनिंगची माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करा किंवा ईमेल वा ऑनलाईन तक्रार प्रणालीचा वापर करून आपली तक्रार नोंदवा, असे आवाहन जनतेस करण्यात आले आहे. राज्यस्तरीय हेल्पलाईन ही सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार असून त्याचा हेल्पलाईन क्रमांक : 1800 22 4950/1967 (नि:शुल्क) आहे. अन्य हेल्पलाईन क्रमांक : 022- 23720582 / 23722970 / 23722483, ईमेल- helpline.mhpds@gov.in, ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी mahafood.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन तक्रार निवार...

सर्व धान्य दुकानदारांकडुन नागरिकांची फसवणुक होऊ नये म्हणुन समता सैनिकांचे लक्ष्य - बाप्पुसाहेब मेहेर

Image
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लाँकडाऊन काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये. यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागांकडून  विविध ऊपाय योजना केल्या आहेत. राज्यातील स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वितरण सुरळीत असुन आत्तापर्यंत  २२ लाख  ८३ हजार १८० क्विंटल अन्नधान्यांचे  वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री छगनजी भुजबळ साहेब यांनी दिली आहे. समता परिषद पुणे श्री बापूसाहेब मेहेर यांनी सांगितले आहे की अंत्योदय योजना अंतर्गत, बी  पि  एल कार्ड असलेल्या लाभार्त्यना २ रु किलो दराने प्रति कार्ड १५ किलो गहू आणि ३ रु किलो दराने प्रति कार्ड २० किलो तांदूळ दिला जातो, तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्रधान्य कुटूंब लाभार्थ्यांना २ रु किलो दराने प्रति व्यक्ती ३ किलो गहू आणि 3 रु दराने प्रति व्यक्ती ३ किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे २० रु किलो दराने १ कि साखर दिले जाईल. श्री मेहेर यांनी असेही सांगितले की किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा, या करिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध...