सर्व धान्य दुकानदारांकडुन नागरिकांची फसवणुक होऊ नये म्हणुन समता सैनिकांचे लक्ष्य - बाप्पुसाहेब मेहेर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लाँकडाऊन काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये. यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागांकडून विविध ऊपाय योजना केल्या आहेत. राज्यातील स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वितरण सुरळीत असुन आत्तापर्यंत २२ लाख ८३ हजार १८० क्विंटल अन्नधान्यांचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री छगनजी भुजबळ साहेब यांनी दिली आहे.
समता परिषद पुणे श्री बापूसाहेब मेहेर यांनी सांगितले आहे की अंत्योदय योजना अंतर्गत, बी पि एल कार्ड असलेल्या लाभार्त्यना २ रु किलो दराने प्रति कार्ड १५ किलो गहू आणि ३ रु किलो दराने प्रति कार्ड २० किलो तांदूळ दिला जातो, तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्रधान्य कुटूंब लाभार्थ्यांना २ रु किलो दराने प्रति व्यक्ती ३ किलो गहू आणि 3 रु दराने प्रति व्यक्ती ३ किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे २० रु किलो दराने १ कि साखर दिले जाईल.
श्री मेहेर यांनी असेही सांगितले की किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा, या करिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध्या लाँकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणाहून काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या तक्रारी प्राप्त होत आहे, जीवनावश्यक वस्तूंची साठे बाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सातवर्षापर्यंत कैद होऊ शकते ,याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग आणि पोलीस यंत्रणा यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश, माननीय श्री भुजबळ साहेब यांनी दिलेले आहेत..
सध्याच्या बिकट परिस्तितीमध्ये दुकानदार व वितरकांनी सामान्य नागरिकांची लूट करू नये. कुठल्याही प्रकारची तक्रार आल्यास सक्त कारवाई करण्यात येईल .
नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास किंवा तक्रार असल्यास श्री बाप्पुसाहेब मेहेर यांना संपर्क साधा - मोबाईल ९८९०१५०६००
बाप्पुसाहेब मेहेर
(समता परिषद पुणे - अध्यक्ष )
(बिझनेस क्लब पुणे - अध्यक्ष )

Comments
Post a Comment