केंद्र शासनाकडून चणाडाळ किंवा तूरडाळ प्रत्येक नागरिकाला 1kg दिली जाणार..काही दिवसात शासनाकडून मिळणार........ बापूसाहेब मेहेर (समता परिषद पुणे)

स्वस्त धान्यापासून वंचित असलेल्या राज्यातील 5 कोटी लोकांसाठी केंद्राने मदत करावी


केंद्र सरकारकडून खरेदी केले जाणारे धान्य महाग असुन त्यात सवलत मिळावी : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान आणि छगन भुजबळ यांचा व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद

अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत येणारे अंत्योदय व बीपीएल योजनेच्या 7 कोटी लाभार्थ्यांना सहा महिने पुरेल एवढे अन्नधान्य राज्याकडे उपलब्ध आहे, परंतु राज्यातील सुमारे 5 कोटी लोक असे आहेत की जे सवलतीच्या स्वस्त धान्यापासुन वंचित आहेत. त्यांच्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. तसेच राज्य शासनाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 3 कोटी 50 लाख लोकांसाठी केंद्राकडून खरेदी केले जाणारे धान्य महाग असुन त्यात सवलत मिळावी अशी मागणी आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. यावेळी बालेतांना मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर राज्यात शिवभोजन थाळीच्या माध्यमातुन केवळ 5 रुपयात 1 लाख थाळींचे दररोज वितरण सुरु आहे. 5 हजार 500 अन्नछत्राच्या माध्यमातुन दोन वेळचे जेवण व नाष्टा विस्थापित मजुर, कामगारांना मोफत दिला जात आहे. हजारो अशासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातुन अन्नदानाचे उपक्रम राज्यभर राबविले जात आहेत, असे असले तरी हे सर्व पुरेसे नाही. केंद्रशासनाच्या अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत बसणारे 7 करोड अंत्योदय व बीपीएल कार्डधारक राज्यात आहेत. त्यातविदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील 50 लाख लाभार्थ्यांना राज्यशासनाने सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील 3 कोटी केशरी कार्डधारकांनाही स्वस्त दरात धान्य देण्याचा निर्णय घेतल्याने 3 कोटी 50 लाख लोकांसाठी केंद्र शासनाकडून राज्यशासन धान्य खरेदी करणार असुन त्यासाठी येणारा खर्च 300 कोटी इतका आहे. हा खर्च अत्यंत मोठा असुन त्यामुळे राज्यातील 3 कोटी केशरी रेशन कार्डधारक आणि ज्यांच्याकडे काहीही नाही अशा विस्थपित व बेघर असलेले 2 कोटी नागरिक अशा 5 कोटी नागरिकांसाठी केंद्रशासनाने मदत करण्याची गरज असुन तशी मागणी राज्यातील विविध लोकप्रतिनिधींमार्फत केली जात आहे याबाबतही यावेळी मंत्री श्री.भुजबळ यांनी केंद्र सरकारला अवगत केले.

बाप्पुसाहेब मेहेर 
समता परिषद पुणे 
बिझनेस क्लब पुणे - अध्यक्ष
संपर्क मोबाईल  ९८९०१५०६००


Comments

Popular posts from this blog

उद्योजक किरण जी दुगाने यांची महात्मा फुले बिझनेस क्लब