फेसबुक वरून महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या वर अक्षपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल... बापूसाहेब मेहेर (समता परिषद पुणे )
दौंड : फेसबुक या सुप्रसिद्ध सोशल साईटवरून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिनेश सुरेश गडधे (रा.बोरीपार्धी,दौंड ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असुन या प्रकरणी मंगेश रायकर यांनी फिर्याद दिली आहे.
देशामध्ये कोरोनाच्या प्रभाव वाढला आहे. कोरोन्याच्या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये या साठी देशामध्ये लॉकडाउन करून संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने सर्वांना घरांमध्ये बसून सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. या काळामध्ये टीव्ही बरोबरच लोक सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहे. पोलीस प्रशासनाने सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत सावधगिरी बाळगण्याच्या सर्वांना सुचना दिल्या आहेत. बोरीपार्धी येथे राहणाऱ्या दिनेश गडधे यांनी शनिवार(ता.१८) रोजी फेसबुक या सोशल मीडियावरील दिनेश
गडधे याच्या स्वतःच्या अकाउंट वरून महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती, म्हणून दिनेश सुरेश गडधे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्योती झुरंगे, दौंड तालुका अध्यक्ष सचिन रंधावे व कार्याध्यक्ष मंगेश रायकर यांनी निवेदनाद्वारे केली होती. दरम्यान, मंगेश रायकर यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीवरून कलम ५०० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बाप्पुसाहेब मेहेर
समता परिषद पुणे
बिझनेस क्लब पुणे - अध्यक्ष
संपर्क मोबाईल ९८९०१५०६००
संपर्क मोबाईल ९८९०१५०६००

Comments
Post a Comment